सन्माननिय सभासद बंधु-भगिनीनो,
सस्नेह नमस्कार
विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या वतीने सन २०२१-२०२२
या आर्थिक वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीचा अहवाल, वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेला ताळेबंद पत्रक तसेच
सन २०२२-२०२३ चे अंदाज पत्रक सादर करताना अतिशय आनंद होत आहे.
संस्थेने अहवाल सालात केलेल्या कार्याची माहिती खालील प्रमाणे :
सभासद :
समाजातील सर्व थरातील सभासदांना सेवा उपलब्ध व्हावी असे प्रयत्न सातत्याने करीत आहोत. गतवर्षी संस्थेमध्ये २१,३२१
सभासद होते. तर अहवाल वर्षात निवृत्त सभासदांची संख्या १४५ आहे. तर प्रवेश दिलेल्या सभासदांची संख्या १९९३ आहे. तरी
अहवाल वर्ष अखेर २३१६९ सभासद अहवाल पटावर आहेत.
भाग भांडवल :
भाग भांडवलात अहवालसाली लक्षणीय वाढ झाली असून गतवर्षी संस्थेचे एकूण वसुल भाग भांडवल ₹ २,७४,८६,५००/-
इतके होते. त्यामध्ये या वर्षी ₹ २३,४२,४००/- ची वाढ झाली असून अहवाल वर्षी ₹ १३,८९,४००/- चे भाग परत गेले असून
अहवालसाली शेवटी एकूण भाग भांडवल ₹ २,८४,३९,५००/- एवढे आहे.
गुंतवणूक :
सर्व बँकामध्ये शेअर्स व ठेवी मिळून एकूण ₹ २४,१२,२५,३९९/- एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे.
अंतर्गत हिशोब तपासणी:
संस्थेची अंतर्गत हिशोब तपासणी मे. विलास आर. जाधव, चार्टर्ड अकौटंटस् यांनी केली असून त्यांनी मोलाचे सहकार्य केले.त्यांनी सन २०२१-२०२२ च्या हिशोबाची पुस्तके तपासली व नवीन सुचनेद्वारे मार्गदर्शन केलेआहे.त्याबद्दलआम्हीत्यांचेआभारी आहोत.
वैधानिक हिशोब तपासणी:
संस्थेची सन २०२१-२०२२ या सालाची वैधानिक हिशोब तपासणी मे. एस. एन. काटदरे अॅन्ड कंपनी, चार्टर्ड अकौटंट यांनी केली असून सन २०२१-२०२२ या साला करीता संस्थेस ‘अ’ वर्ग दिला आहे. तरी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल संस्था आभारी आहे.
संचालक मंडळ :
अहवाल कालावधीमध्ये संचालक मंडळाच्या एकूण १२ सभा झाल्या त्यामध्ये सर्व संचालकांनी सहभाग घेऊन संस्थेच्या
प्रगतीच्या दृष्टीने सर्वानुमते निर्णय घेऊन कामकाजात गतीमानता राखण्याचा प्रयत्न केला आहे.