अध्यक्षांचे मनोगत…. !
सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो,
विशालदीप सहकारी पतसंस्थेचा २१ वा वार्षिक अहवाल त्याच बरोबर सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे नफा तोटा पत्रक ३१ मार्च २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रक व अंदाज पत्रक आपणासमोर
सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.एकमेकांस सहाय्य करु! अवघे धरू सुपंथ !! या सहकाराच्या ब्रिद वाक्यानुसार दिनांक २३-१०-२००१ रोजी अल्पशः भाग भांडवलावर समाजातील गरजु व्यक्तीना सावकारी पाशातून मुक्त करणे त्यांच्या योग्यतेनुसार कर्ज पुरवठा करणे व तळागाळातील लोकांना बचतीची सवय लावणे या हेतूने विशालदीप सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली.

रिझर्व बँकेच्या नवीन बँक परवाना या धोरणामुळे बँकीग क्षेत्रात नवीन खाजगी बँका, वित्तीय संस्था, फायनास कंपनी एटीएम याद्वारे तुरंत उपलब्ध होणारी कॅश सुविधा इत्यादी कारणामुळे बँकीग क्षेत्रात तिव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या युगात खातेदारांना दर्जेदार सेवा, सुरक्षितता व त्याच्यांशी असलेले आपुलकीचे संबंध यामुळे संस्थेची आर्थिक उन्नती झाली आहे. संस्थेस  ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.  ठेव व कर्ज व्यवहारामध्ये चांगल्याप्रकारे वाढ केली आहे. खर्चामध्ये काटकसर केल्यामुळे संस्थेस प्रतिवर्षी चांगल्या प्रकारे नफा होत आहे. आपल्या सर्वाच्या सहकार्याने संस्थेने ३१ मार्च २०२२ पर्यंत १०० कोटीचा संमिश्र व्यवसाय पार केला आहे.विशालदीप सहकारी पतसस्था मयादित, मुबई संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, अधिकारी वर्ग, कर्मचारी वृंद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक या सर्वांच अखंडित योगदान असल्यामुळे संस्थेची प्रगती दिसत आहे. यापुढे आपले सर्वांचे सहकार्य मिळेल हिच सदिच्छा, आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय सहकार !!!


श्री. बाळकृष्ण नामदेव पाटील

अध्यक्ष / संस्थापक

sahebxbbxx

संस्थेची ठळक वैशिष्टे