विशालदीप सहकारी पतसंस्था मर्यादित,मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे .

gold
house
loan
vehical
1
previous arrow
next arrow

समाजामध्ये ज्या व्यक्तीकडे साधन संपती, पैसा मुबलक असतो, ती व्यक्ति आपला स्वत:चा आणि इतरांचा विकास करू शकते. हा एकमेव उदेश डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशाने देशातील साधन सामुग्री, संपती, विपुल मानवी साधन सामुग्रीचा योग्य तो वापर करून आर्थिक विकासाचा वेग वाढविला आहे. यामुळे समाजाचे उदिष्ट साध्य  होऊन विकास होऊ लागला आहे.

माणसाला ज्या वेळी गरज निर्माण होते त्या वेळी तो गरज भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढीत असतो. सावकाराचा व्याजाचा दर जास्त असतो. मग तो आपली निकडची गरज पूर्ण करण्यासाठी कमी व्याजाणे पैसे कोठे मिळतात का ! याचा शोध घेऊ लागला. या उद्देशातूनच मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातील  अनेक कामगार, छोटे – मोठे व्यवसायीक हे आपल्या पैशाची गरज भागविण्यासाठी भागाभाग करून वेळ निभावून नेत होते. त्यांनी आपल्या पैशाची गरज भागविण्यासाठी एकत्र येऊन गरज निवारण फंडाद्वारे पैसा जमा करून त्यातील ज्या कोणास गरज निर्माण होईल त्याने ती रक्कम घ्यायची व आपली गरज भागवून वेळ निभावून न्यायची अशी भिशीची परिस्थिती चालू होती. पण यामध्ये बरीच रिस्क होती. पैसे घेऊन एकदा पळूनही जायचा किंवा पैसे द्यायला कानाडोळा करीत असे. यामुळे या भिशी बंद पडत होत्या.

आपली निकडची गरज कमी व्याज दरात पूर्ण कशी होईल याच विचारातून या पतसंस्थेचा जन्म झाला. पतसंस्था, बँकांच्या मधामातून तो आपली निकडची गरज पूर्ण करू लागला. व्यक्ति, समाजाची निकडीची गरज पूर्ण व्हायची असेल तर त्यास आर्थिक स्थैर्याची गरज लागते. ही गरज सहकार माध्यमातून संघटित होऊन कार्य केल्यास मिळते व उध्दार होतो.

0
एकुण सभासद
0
एकुण ठेवी (कोटी मध्ये )
0
एकुण कर्ज (कोटी मध्ये )
0
समिश्र व्यवसाय (कोटी मध्ये)